पाच अट्टल चोरटे पालिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:13 AM2021-01-24T04:13:59+5:302021-01-24T04:13:59+5:30

हिंगोली : घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लांबविणाऱ्या ५ सराईत चोरट्यांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ...

Five thieves were arrested by the police | पाच अट्टल चोरटे पालिसांनी केले जेरबंद

पाच अट्टल चोरटे पालिसांनी केले जेरबंद

Next

हिंगोली : घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लांबविणाऱ्या ५ सराईत चोरट्यांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पावणेपाच लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, त्यांच्या अटकेमुळे आणखी काही चोरीच्या घटना उघडकीला येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील हट्टा, वसमत ग्रामीण, आखाडा बाळापूर, कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी हैदोस घातला होता. चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीसही हतबल झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला होता. अखेर चोरीच्या घटनांतील आरोपी हे पूर्णा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विलास रमेश शिंदे (रा. कवठा रोड, वसमत), राजू उर्फ अन्या महादेव भोसले, गिडप्पा उर्फ गिड्या गंगाप्पा भोसले, राजूभाऊ उर्फ सुन्ना उर्फ बिरांडा गंगाप्पा भोसले (तिघे रा. तहसीलजवळ गायरान पूर्णा), आकाश बालाजी डोईजड (रा. कोहिनूर कॉलनी, वसमत), साच्या गिडप्पा भोसले, गुंड्या गिडप्पा भोसले, रिन छगणी पवार (तिघेही रा. पूर्णा) यांचा या चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्णा येथे छापा मारला असता, विलास रमेश शिंदे, राजू उर्फ अन्या महादेव भोसले, गिडप्पा उर्फ गिड्या गंगाप्पा भोसले, राजूभाऊ उर्फ सुन्ना उर्फ बिरांडा गंगाप्पा भोसले, आकाश बालाजी डोईजड हे त्यांचे घरी सापडले. पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सन २०२०मध्ये हट्टा, वसमत ग्रामीण, आखाडा बाळापूर, कुरूंदा पोलीस ठाणे अंतर्गत रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार ६०० रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच ५० हजार रूपये किमतीची दुचाकी असा एकूण ४ लाख ७४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासासाठी चोरट्यांना वसमत ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे आणखी काही चोरीच्या घटना उघडकीला येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांभ घेवारे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, अशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, राजूसिंग ठाकूर, शंकर ठोंबरे, किशोर कातकडे, विशाल घोळवे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, दीपक पाटील, विठ्ठल काळे, आकाश टापरे आदींच्या पथकाने केली.

फाेटाे नं. २३ एचएनएलपी १६

Web Title: Five thieves were arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.