...अखेर खड्डे बुजविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:00+5:302021-02-06T04:55:00+5:30

हिंगोली ते नांदेड महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. यातील कळमनुरी तालुक्यातील उमरा ते माळेगाव दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने ...

... finally began to fill the pits | ...अखेर खड्डे बुजविण्यास सुरुवात

...अखेर खड्डे बुजविण्यास सुरुवात

हिंगोली ते नांदेड महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. यातील कळमनुरी तालुक्यातील उमरा ते माळेगाव दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यात उमरा परिसर, मसोड फाटा, कळमनुरी, मोरवाडी, माळेगाव परिसरातील खड्डे तर जीवघेणे ठरत होते. धुळीमुळे तर डोळ्यांना त्रास वाढला होता. यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात होता. या संदर्भात ‘लोकमत’ने २५ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. उमरा, मसोड फाटा, कळमनुरी, मोरवाडी भागातील पडलेले खड्डे बुजविण्यात आले, तसेच माळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहनचालकांतून समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, यापूर्वीही याच मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, खड्डे बुजविताना यात समानता राखली नसल्याने बुजविलेल्या खड्ड्यातून वाहने जाताना आदळत आहेत. आता यंत्राद्वारे खड्डे बुजविण्यात येत असल्याने चालकांना वाहने चालविताना सोपे जात आहे.

Web Title: ... finally began to fill the pits