शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम रिक्त पदे पदोन्नतीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:26+5:302021-02-05T07:54:26+5:30

हिंगोली : शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम रिक्त पदे भरावी, असे निवेदन जि. प. माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणमत्र्यांना दिले ...

Fill the Deputy Education Officer and similar vacancies in the Education Department by promotion | शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम रिक्त पदे पदोन्नतीने भरा

शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम रिक्त पदे पदोन्नतीने भरा

हिंगोली : शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम रिक्त पदे भरावी, असे निवेदन जि. प. माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणमत्र्यांना दिले आहे.

शासन निर्णयानुसार राज्यातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम रिक्त पदे जिल्हा तांत्रिक सेवा गट ‘क’ मध्ये येणाऱ्या जि.प. माध्यमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेने अभावितपणे पदोन्नतीने त्वरीत भरण्याबाबतचा निर्णय झाला. यासंबंधी शालेय शिक्षण विभागाने ११० जि.प. माध्यमिक शिक्षकांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवून त्या प्रस्तावाला मान्यता दिली. यानंतर हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असता ऑक्टोबर २०२० मध्ये सदरील प्रस्तावाला वित्त विभागाने हिरवा कंदील दाखविला. पण गेल्या चार महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडलेली आहे. राज्यातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे रिक्त आहे. तसेच या प्रस्तावातील यादीतील शिक्षकही सेवानिवृत्त होत असून ही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे जि.प. माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे. या निवेदनावर संघाचे राज्याध्यक्ष व्ही.पी. फुलतांबकरसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Fill the Deputy Education Officer and similar vacancies in the Education Department by promotion