सामाईक रस्त्यावरून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST2021-09-19T04:30:28+5:302021-09-19T04:30:28+5:30

याबाबत प्रशांत व्यंकटराव भोरगे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सामाईक रस्त्याने का आला या कारणाने चार जणांनी थापडाबुक्क्याने ...

Fighting in two groups on a common road | सामाईक रस्त्यावरून दोन गटात हाणामारी

सामाईक रस्त्यावरून दोन गटात हाणामारी

याबाबत प्रशांत व्यंकटराव भोरगे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सामाईक रस्त्याने का आला या कारणाने चार जणांनी थापडाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी प्रशांत भोरगे यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी प्रशांत भोरगे यांच्या फिर्यादीवरून बालाजी नागोराव भोरगे, तुकाराम नागोराव, विकास तुकाराम भोरगे, सुनीता बालाजी भोरगे यांच्याविरुद्ध नोंद घेण्यात आली आहे. तर सुनीता बालाजी भोरगे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, शेतातील रस्त्याने जाण्याच्या कारणावरून दोघांनी ढकलून दिले. तसेच थापडाबुक्क्याने मारहाण केली. सासू व पुतण्या भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना तिघांनी शिवीगाळ करून सासूला दगडाने मार दिला. जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी सुनीता भोरगे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत व्यंकटी भोरगे, रंजना प्रशांत भोरगे, सचिन प्रशांत भोरगे, प्रतीक प्रशांत भोरगे यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार वडकिले करीत आहेत.

Web Title: Fighting in two groups on a common road