शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:55 PM

तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आदिवासी समाजबांधव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ३ आॅक्टोबर पासून उपोषण बसले आहेत. तिसºया दिवशी उपोषण सुरूच होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आदिवासी समाजबांधव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ३ आॅक्टोबर पासून उपोषण बसले आहेत. तिसºया दिवशी उपोषण सुरूच होते.डोणवाडा येथील आदिवासी समाजाची गायरान व हक्क जमिनीवरील कुडाणाची व कच्च्या झोपड्या असलेल्या घराची जवळपास ८०० लोकसंख्येची वस्ती आहे. वस्तीजवळच अवैध ब्लास्टिंग करून दगडाचे उत्खनन होत असून या ब्लास्टिंगमुळे मानवी वस्तीत मोठे दगड येऊन पडत आहेत. त्यामुळे प्राणी व मुलाबाळांनासह माणसांच्या जीवित्तास धोका असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी मंडळाधिकारी, पोलीस प्रशासनास निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने २१ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निवेदन दिले होते. परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने ३ आॅक्टोबर पासून आदिवासी समाजबांधवांनी उपोषण सुरू केले आहे. अवैध ब्लास्टिंग थांबविणे, घराची नोंद ग्रामपंचायतला करून नमुना नंबर ८ देणे, वन हक्क व गायरान मध्ये अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या सातबारावर नोंद घेणे, डोणवाडा येथील गट क्र. ७२ च्या सातबारा आॅनलाइन करणे, यासह विविध मागण्यांची पुर्ततेसाठी उपोषण केले जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा