रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:04 IST2018-05-14T01:04:29+5:302018-05-14T01:04:29+5:30
तालुक्यातील घोटा देवी येथे हळद घोळत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमी शेतक-यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील घोटा देवी येथे हळद घोळत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमी शेतक-यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दत्तराव हिराजी पातळे असे शेतकºयाचे नाव आहे. ते हळद घोळत असताना त्यांच्या अंगावर रानडुकराची झडप आली. यात पातळे यांना रानडुकराचा जोराचा धक्का लागल्याने ते खाली कोसळले व त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला.