माळधामणी येथील शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:14 IST2018-07-29T23:13:37+5:302018-07-29T23:14:04+5:30

तालुक्यातील माळधामणी येथील शेतमजूराने २९ जुलै रोजी गायरान जंगलात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Farmer suicides in Maldhamani | माळधामणी येथील शेतमजुराची आत्महत्या

माळधामणी येथील शेतमजुराची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील माळधामणी येथील शेतमजूराने २९ जुलै रोजी गायरान जंगलात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
माळधामणी येथील सुभाष सोनाजी खिल्लारे (५२) हे शिवणी खुर्द येथे अमित साकळे यांच्या शेतातील आखाड्यावर राहत होते. त्यांचे शेत ते मागील दहा वर्षापासून बटईने करत होते. २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता घरी न सांगता ते घराबाहेर पडले. माळधामणी शिवारातील गायरान जंगलात झाडाला रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली. २९ जुलै रोजी शेळ्या चारणाऱ्यांना सुभाष खिल्लारे यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. त्यांनी गावात ही माहिती दिली. ग्रामस्थांनी ही बाब पोलीस ठाण्याला सांगीतली त्यावरुन फौजदार एस.एस.जामगे, रिठ्ठे आदींनी घटनास्थळी जावून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आकस्माक मृत्यूची नोंद करण्याची प्रकीया सुरु होती.

Web Title: Farmer suicides in Maldhamani