चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST2018-11-16T00:15:29+5:302018-11-16T00:15:58+5:30
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.

चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.
औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील शिवजी कºहाळे या शेतकºयाने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करीत असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खा.राजीव सातव,आ.डॉ. संतोष टारफे, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, बाबा नाईक, रमेश जाधव, केशव नाईक,मारोती कºहाळे, नगरसेवक सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे, बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, शासनाने राबविलेली कर्जमाफी फसवी आहे.शेतकºयांना याचा फायदा कमी नुकसान जास्त झाले आहे. नोटबंदीमुळे उद्योगपतींना फायदा झाला. याचा थेट परिणाम शेतकºयांवर झाला आहे. आधीच दुष्काळ त्यात शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी होरपळून गेला आहे. आॅनलाईनच्या त्रांगड्यात शेतकरीच आॅफलाईन झालो. अशा परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने राज्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा विषय घेऊन सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार आहे. यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला परिपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या.
दौºयादरम्यान वगरवाडी येथील शेतकºयांनी रस्त्यावर गाड्या थांबवून विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या ताफ्याला शेतात नेले. यावेळी शेतकºयांनी विविध व्यथा मांडल्या. तेव्हा विखे यांनी उपस्थित अधिकाºयांना तालुक्यातील वास्तव मांडून वसमत व औंढा नागनाथ तालुका दुष्काळी यादीत घेण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्याकडे नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.