बहुप्रभाग पद्धतीने पुन्हा दिग्गजांचे चेहरे उजळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:50+5:302021-09-25T04:31:50+5:30

हिंगोली नगरपालिकेत मागच्या वेळी दोन सदस्यीय प्रभागाप्रमाणे निवडणूक झाली होती. त्याचप्रमाणे यावेळीही होणार आहे. केवळ जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय ...

The faces of the veterans lit up again in a multi-ward manner | बहुप्रभाग पद्धतीने पुन्हा दिग्गजांचे चेहरे उजळले

बहुप्रभाग पद्धतीने पुन्हा दिग्गजांचे चेहरे उजळले

googlenewsNext

हिंगोली नगरपालिकेत मागच्या वेळी दोन सदस्यीय प्रभागाप्रमाणे निवडणूक झाली होती. त्याचप्रमाणे यावेळीही होणार आहे. केवळ जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय तेवढा रद्द झाल्याने उर्वरित प्रक्रिया मागच्या वेळी सारखीच होणार आहे. आता या प्रभागांमध्ये आरक्षण कसे पडते, यानुसार चेहरे बदलणार आहेत; मात्र अनेक दिग्गजांना मोठ्या प्रभागात जातीय, सामाजिक समीकरणे जुळवत एकाऐवजी दोन जागा निवडून आणण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद होत असल्याचे दिसत आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत एक तर प्रभागाचा आकार लहान झाल्याने अनेक उमेदवार रिंगणात राहण्याची भीती होती. शिवाय नव्याने प्रभाग रचना झाल्याने त्यात ठरावीक भागच एकीकडे गेला की, काही नव्या चेहऱ्यांना आपोआपच संधी निर्माण होण्याची भीतीही होती. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग रचनेत नेमके काय होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. आता दोन सदस्यीय प्रभाग रचनेत काही बदल झाले तरीही तेवढे मोठे बदल होणे शक्य दिसत नाही. शिवाय काही मतदारांनी नाव वगळणे व वाढविणे या प्रक्रियेत प्रभाग बदलला तर तेवढ्याच नव्या लोकांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. प्रभागातील दोन्ही जागा आरक्षणात गेल्या तरच काही ठिकाणी दिग्गजांची गोची होऊ शकते, अन्यथा अनेकांना पूर्वीप्रमाणेच मोठ्या क्षेत्रात लढण्याची संधीही मिळू शकते. काही दिग्गजांना तर प्रभाग रचनेचा तेवढा अडसरही नसतो. असे काही चेहरे प्रत्येक वेळी वेगळ्या भागातून नशीब आजमावताना दिसतात.

यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत मागच्या प्रमाणेच युती किंवा आघाडी होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादी हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तर नगराध्यक्ष मात्र भाजपचा झाला. राष्ट्रवादी १३, काँग्रेस ६, शिवसेना ६, भाजप ३, मनसे २, अपक्ष १ व एमआयएम १ असे पक्षीय बलाबल होते. यावेळी नगराध्यक्ष पद नगरसेवकांतून राहणार असल्याने सर्वच पक्ष आपापल्या परीने जोर लावणार असल्याचे दिसत आहे; मात्र एकसदस्यीय पद्धतीत अपक्ष म्हणून नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा यात हिरमोड झाला आहे.

Web Title: The faces of the veterans lit up again in a multi-ward manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.