नेत्र तपासणी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:27 IST2018-10-30T00:26:42+5:302018-10-30T00:27:00+5:30
तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथे राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर सेल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शिबीर झाले.

नेत्र तपासणी शिबीर
हिंगोली : तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथे राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर सेल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शिबीर झाले. उद्घाटक आ. रामराव वडकुते तर अध्यक्षस्थानी डॉ.लक्ष्मण पठाडे, माधव कोरडे, बालाजी घुगे, केदार डांगे यांच्यासह सर्व डॉक्टर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डिग्रस कºहाळे परिसरातील ६०० रुग्णांनी लाभ घेतला. यापैकी ९० रुग्णांचे मोतीबिंदू आॅपरेशन करणे गरजेचे असल्याचे आढळून आले. उदगीर लायन्स नेत्र रुग्णालय येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून येण्याजाण्याची व राहण्याची मोफत व्यवस्था आहे. तसेच ५०० रुग्णांना प्रथमोपचार म्हणून औषधी वाटप करण्यात आली. हा कार्यक्रम राष्टÑवादी काँग्रेस पार्टी व राष्टÑवादी काँग्रस डॉक्टर्स सेल यांच्या वतीने करण्यात आला.