शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 14:24 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कळमनुरी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी ढिगारे कापडाने झाकून ठेवली होती, परंतु जमिनीला ओल येऊन पिकाचे नुकसान होत असल्याने  शेतकरी  चिंताक्रांत झाले आहेत.

कळमनुरी तालुक्‍यात ५२ हजार ६९५ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होतो. सोयाबीनमध्ये पाणी शिरत असल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. तालुक्यात ७४ हजार १७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये कापूस लागवड ८ हजार १४० हेक्टरवर झाली आहे. सध्या कापूस फुटलेला असून यामध्ये पाणी झाले आहे, कापसाची बोंडे ओली चिंब झाली आहेत. तसेच ज्वारीचा पेरा १ हजार २७५ हेक्‍टरवर असून सततच्या पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे.

परिसरातील कयाधू नदी भरून वाहत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सूचना तहसिलदारांनी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांना दिल्या आहेत. सध्या नुकसानीचा सर्वे सुरू आहे. सोयाबीन कापणीच्या वेळी पाऊस पडत असल्यामुळेशेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी अगोदरच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा पावसाने संकटांचे ढग अधिकच गडद केले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद