शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शेवटपर्यंत शेतकऱ्यांना मिळेना कालव्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:08 IST

कुरूंदा भागातील शेवटच्या टोकापर्यंत भाटेगाव कालव्याचे पाणी मिळत नसल्याने पिंपराळा, मंहमदपुरवाडी, माहगाव भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : कुरूंदा भागातील शेवटच्या टोकापर्यंत भाटेगाव कालव्याचे पाणी मिळत नसल्याने पिंपराळा, मंहमदपुरवाडी, माहगाव भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकºयांच्या जमिनी गेल्या पण कालव्याद्वारे अजिबात पाणी मिळत नसल्याने इसापूर धरणाच्या पाण्यापासून शेतकºयांना वंचित रहावे लागत आहे. पाण्याचे नियोजन पैनगंगा प्रकल्पाच्या सिंचन विभागाला लागलेला नसल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचताना दिसत नाही.कुरूंदा भागामध्ये इसापूर धरणाचे पाणी भाटेगाव कालव्याद्वारे येते. कुरूंदा गावाच्या पुढे पाणी पोहचण्यास अडथळे निर्माण झाल्याने किंवा नियोजनअभावी पिंपराळा, माहगाव, मंहमदपुरवाडी या गावांना पाणी मिळत नाही. अनेक वर्ष झाले या तिन्ही गावातील जमिनी कालव्यासाठी गेल्या. परंतु या भागातील शेतकºयांना पाणी मिळालेच नाही. पिंपराळा, महंमदपूरवाडी, माहगाव भागातील शेतकरी कालव्याची पाणीपट्टी उपलब्ध करून देखील त्यांना पाणी देण्यास दिरंगाई होत आहे. सिंचन विभागाचा नियोजन लागलेला नाही. चोख नियोजनाची आवश्यकता आहे. या भागाकरिता जवळपास पाच ते सात दिवस पाणी कालव्यात उपलब्ध असतो. नियोजनचा अभाव असल्याने सात दिवसांमध्येही शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळत नाही. मोठी कसरत करून देखील पाणी मिळत नसल्याने शेतकºयांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पिंपराळा, माहगाव, मंहमदपुरवाडी भागातील शेतकºयांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पिंपराळा भागातील शेतकºयांना कालवा असताना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने पिंपराळा माहगाव भागातील हळदीचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले. तर रब्बी पेरणी देखील कोलमडली आहे. आतापासून पाणी पातळी खालावल्याने धरणाच्या पाण्यावरच बागायती पिकासह हळद उत्पादन अवलंबून होते. त्यात शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यास झालेली दिरंगाई या भागातील शेतकºयांसाठी अडचणीची ठरली आहे.सिंचनाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा पिछाडीवरच आहे. इसापूर धरणाचे पाणी भाटेगाव कालव्याच्य पट्ट्यापर्यंत कळमनुरीचा मोजका तर वसमत तालुक्यातील कुरूंदा भागापर्यंत फायदा होता. पाण्याची पहिली पाळी नांदेड जिल्ह्याला अगोदर जाते. त्यानंतर या भागातील पाणी मिळते. त्यात शेवटच्या टोकला पाणी उपलब्धही होत नाही. कुरूंदा भागात पाणी येऊनही दाभडीच्या नाल्याद्वारे पुर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून मालेगाव भागात पाणी जाते. पाणी कोणीकडेही त्याचा अधिकचा फायदा नांदेड जिल्ह्यालाच होतो. आरक्षीत पाण्याचा अधिकार फारसा वापरल्या जात नाही. त्यात राजकीय वजन असणारे नांदेडचे वजन अधिकपडते. एका प्रकारे जिल्ह्याचा विचार केल्यास केवळ नावालाच पाणी दिल्या जाते. शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे नियोजन अद्याप आखल्या न गेल्याने धरणाचे पाणी पिंपराळा परिसरात मिळताना दिसत नाही. पिंपराळा भागापर्यंत पाणी देण्याचे नियोजन होते. तसे आम्हीपर्यंत देखील केले. परंतु कालव्यामध्ये जागोजागी पाणी उपसासाठी पाईप टाकले आहेत. त्यामुळे प्रयत्न करुनही पाणी शेवटच्या भागापर्यंत गेले नाही. पाईप टाकणाºया या शेतकºयांना नोटीसा दिल्या असून कार्यवाही केल्या जाईल, असे सिंचन शाखाअभियंता पत्की यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प