शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

२१ फेब्रुवारीनंतर ‘जलेश्वर’वरील अतिक्रमणे हटणार; विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:49 PM

अतिक्रमणावर थेट कारवाई होणार 

ठळक मुद्देभूमिअभिलेख कार्यालयाने केले रेखांकन विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला अधिक गती आली असून महसूल प्रशासनाने थेट कारवाईच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत. त्यामुळे २१ फेब्रुवारीनंतर येथील अतिक्रमण कोणतीही पूर्वसूचना न देता हटविण्यात येणार आहे. 

जलेश्वर तलावाकाठावरील १९५ अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसीद्वारे कळविले होते; परंतु संबंधित अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे हिंगोली शहरातील जलेश्वर तलावासमोरील सर्व्हे नं. ०३ मधील अतिक्रमण भागाचे १५ फेब्रुवारी रोजी तालुका निरीक्षक भूमिअभिलेख यांच्यामार्फत रेखांकित करण्यात आले. तसेच अतिक्रमणधारकांना पुन्हा रीतसर नोटिसांद्वारे अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचनाही दिल्या. त्यामुळे आता २१ फेब्रुवारीनंतर सदरील अतिक्रमण केव्हाही व कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल प्रशासनाच्या वतीने काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमणासाठी प्रशासनाने केलेला सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे यापूर्वीच अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, या ठिकाणच्या अतिक्रमणधारकांना मागील वर्षभरापासून प्रशासन वारंवार सूचना देत आहे. यासाठी अतिक्रमणाधारकही निवेदने देताना आढळत होते. मात्र अतिक्रमणे काही हटली नाहीत. त्यामुळे इतरांनीही तलावात गाळ टाकून अतिक्रमण करण्याचा सपाटा चालविला होता. आता या सर्व बाबींना चाप बसणार आहे. नुकत्याच झालेल्या एका अतिक्रमणानंतर या कारवाईला वेग आला होता. या अतिक्रमणात या तलावाचे आऊटलेटही बुजले आहे. त्यामुळे या तलावाचे हाल जास्त प्रमाणात झाले. तलावातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडलेच नाही. शिवाय शहरातही पाणी येण्याचे मार्ग अनेक ठिकाणी बंद झाले आहेत.

मंदिर संस्थान धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यकश्री जलेश्वर संस्थनच्या सर्व विश्वस्त समिती सदस्यांनी दोन एकर जमिन अधिग्रहण करण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु सदर बाबीकरीता संस्थानला महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट अधिनियमचे कलम ३६ अन्वये धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून भुसंपादन कायद्यान्वये मोबदलाची रक्कम कळविणे बाबत माहिती मागविली आहे. जेणेकरून हस्तांतरणासाठीचा अवरोध दूर करण्यासाठी मदत होईल. श्री जलेश्वर संस्थान हिगोली नोंदणी क्र. ए- ६०६ या संस्थानची मालकी व ताब्यामध्ये मौजे मल्हारवाडी येथील जमिन गट क्र. २१ व २२ ही जमिन आहे. शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर जलेश्वर तलाव शुशोभिकरण व तेथील अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. न. प. मुख्याधिकारी यांनी जलेश्वर संस्थान यांना पत्राद्वारे श्री जलेश्वर संस्थानची उपरोक्त मल्हारवाडी येथील एकूण जमिनीपैकी २.५ एकर जमीन पूनर्वसन कामासाठी मागणी केली. संस्थानचे विश्वस्तांनी वरिल बाबीवर चर्चा करून मुख्याधिकाऱ्यांना जवाबपत्र दिले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणHingoliहिंगोली