Electrical shop fire; Loss of lacquer | इलेक्ट्रिकल दुकानाला आग; लाखाचे नुकसान

इलेक्ट्रिकल दुकानाला आग; लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्यावरील कृष्णा इलेक्ट्रिकल या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली.
गावातील मुख्य रस्त्यावर मध्यवर्ती बँकेच्या जवळच असलेल्या गजानन बालाजी भागवत यांचे कृष्णा इलेक्ट्रिकचे दुकान आहे. दिवसभर आठवडी बाजार करून संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते; परंतु रात्री दुकानात शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. बंद दुकानातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकान मालकास बोलावून घेतले व विद्युत पुरवठा बंद करून दुकानाचे शटर उघडले. जळत असलेल्या साहित्यावर शेजारील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला व अग्निशामक दलास पाचारण बोलाविले. परंतु अग्निशामक दलाची गाडी येण्याच्या पूर्वीच आग विझविली होती. या दुर्घटनेत इलेक्ट्रिक सामान व इतर साहित्य अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Electrical shop fire; Loss of lacquer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.