निवडणूक निरीक्षकांची औंढा येथे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:32+5:302021-01-08T05:36:32+5:30
औंढा तालुक्यामध्ये ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने ४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ च्या दरम्यान ...

निवडणूक निरीक्षकांची औंढा येथे भेट
औंढा तालुक्यामध्ये ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने ४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ च्या दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी औंढा नागनाथ तहसीलसमोर उमेदवारांसह इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी चार वाजता निवडणूक निरीक्षक संतोषी देवकुळे यांनी तहसीलला भेट दिली. यावेळी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कृष्ण कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, तहसीलदार वैजनाथ भालेराव, निवडणूक अधिकारी नयना पाटील यांची उपस्थिती होती. ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत त्यांनाही निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांनी औंढा तहसीलमध्ये व परिसरामध्ये बंदोबस्त लावला होता.