वसमत तालुक्यात ६९७ जागांसाठी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST2021-01-08T05:38:08+5:302021-01-08T05:38:08+5:30
वसमत : तालुक्यात १०६ ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू झाली आहे. त्यातील ९ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता ९७ ग्रामपंचायतींच्या ६९७ ...

वसमत तालुक्यात ६९७ जागांसाठी निवडणूक
वसमत : तालुक्यात १०६ ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू झाली आहे. त्यातील ९ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता ९७ ग्रामपंचायतींच्या ६९७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्यात राजकीय वातावरण तापत चालले आहे.
वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या ८८८ जागांसाठी निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील १७९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील १२ जागांवर एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे त्या १२ जागा रिक्त राहणार आहेत. आता ६९७ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ६९७ जागांसाठी १,८७८ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. दोन, तीन पॅनलमध्ये लढत आहे. ग्रामपंचायत ताब्यात राहावी यासाठी सर्व पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत.