आठ हजारांची हातभट्टी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST2021-04-19T04:27:08+5:302021-04-19T04:27:08+5:30

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर ते सालापूर रोडवरून एका ऑटो रिक्षातून हातभट्टीची दारू अवैध विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर ...

Eight thousand handfuls of liquor seized | आठ हजारांची हातभट्टी दारू पकडली

आठ हजारांची हातभट्टी दारू पकडली

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर ते सालापूर रोडवरून एका ऑटो रिक्षातून हातभट्टीची दारू अवैध विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स.पो.नि. रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. हणमंत नकाते, पाेहेकॉ नागोराव बाभळे, चालक पंडित बाधमवाड, होमगार्ड गायकवाड यांच्या पथकाने रामेश्वर ते सालापूर परिसरातील कॅनाल परिसरात एका एम.एच. २२ यु. ०९९६ या ऑटो रिक्षाला थांबवून आतमध्ये पाहणी केली असता एका कॅनमध्ये ४ हजारांची तर दुसऱ्या प्लास्टिकच्या भांड्यात ४ हजारांची अशी ८ हजारांची हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह १ लाख रूपये किमतीचा ऑटोरिक्षा जप्त केला आहे. याप्रकरणी पो.उप.नि. हणमंत नकाते यांच्या फिर्यादीवरून शेख मुजिब शेख गुलाब (रा. छोटा तालाब, वसमत) याच्या विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Eight thousand handfuls of liquor seized