शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

जवानाच्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार; पोलिसांनी जवळच्या मित्राला घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:22 IST

SRPF Jawan's Murder in Hingoli हिंगाेली राज्य राखीव पोलीस दलातील जवान राजकुमार उत्तमराव पवार (वय ३७) यांचा १७ मार्च रोजी लोहगाव शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता.

ठळक मुद्देपोलिसांनी संशयितस रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. 

हिंगोली : अनैतिक संबंधाच्या रागातून मित्रानेच राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. १७ मार्च रोजी एका जवानाचा मृतदेह विहीरीत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी जवानाच्या मित्रास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून लवकरच खूनाचे रहस्य उलगडणार आहे.

हिंगाेली राज्य राखीव पोलीस दलातील जवान राजकुमार उत्तमराव पवार (वय ३७) यांचा १७ मार्च रोजी लोहगाव शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. त्यांना जबर मारहाण केल्याचे दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, सपोनि. बी.आर. बंदखडके, पोउपनि. कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा उत्तमराव पवार यांच्या फिर्यादीवरून बंडू श्यामराव चव्हाण (रा. जांभळी तांडा, ह.मु. पेन्शनपुरा हिंगोली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ मार्च रोजी राजकुमार पवार हे त्यांचा मित्र बंडू श्यामराव चव्हाण यांच्या सोबत भगवान आडे यांना भेटण्यासाठी कारने जांभरून येथे गेले होते. पाहुण्याला भेटल्यानंतर ते परत येत असताना लोहगाव शिवारात रात्री ९ वाजेच्या सुमारास एका दुसऱ्या वाहनासोबत झालेल्या अपघातावरून चौघांसोबत त्यांचा वाद झाला होता. याच संधीचा फायदा घेत बंडू चव्हाण याने राजकुमार पवार यांना जबर मारहाण करून खून करत प्रेत लोहगाव शिवारातील एका विहीरीत टाकून दिले. या प्रकार अनैतिक संबंधातून झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

दरम्यान, सपोनि बी.आर. बंदखडके यांनी पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. तायडे, रविकांत हारकळ, शेख महमंद, अशोक धामणे, चव्हाण आदींचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे पथक रात्रभर आरोपीचा शोध घेत होते. अखेर १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता पोलिसांनी संशयित आरोपी बंडू चव्हाण यास रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली