दारेफळ येथे मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:38 IST2017-12-17T23:38:52+5:302017-12-17T23:38:57+5:30

वसमत तालुक्यातील दारेफळ येथे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी का आला म्हणून मारहाण करण्यात आल्याने आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dwarf assault; 8 cases filed against them | दारेफळ येथे मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

दारेफळ येथे मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : वसमत तालुक्यातील दारेफळ येथे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी का आला म्हणून मारहाण करण्यात आल्याने आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारेफळ येथील बळीराम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तुळशीराम भालेराव, भगवान भालेराव, एकनाथ भालेराव, उद्धव भालेराव, सुभाष भालेराव, बळीराम भालेराव, सोपान भालेराव, संभाजी भालेराव यांनी संगणमत करून फिर्यादीस घरी का आला म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोन्ही हात फॅक्चर केले. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात बळीराम भालेराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा तपास जमादार दिनकर तोंडे हे करीत आहेत.

Web Title: Dwarf assault; 8 cases filed against them