शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 19:15 IST

जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त राहणार असून छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेषातील चिडीमार पथकेही नियुक्त असणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात २५ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली बंदोबस्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे,वसमतचे किशोर कांबळे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक सोनाजी आम्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक शिवाजी गुरमे, हिंगोली शहरचे पंडित कच्छवे, वसमत शहरचे चंद्रशेखर कदम आदींची उपस्थिती होती.

नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्वच पोलीस ठाणे स्तरावर दंगा नियंत्रण सराव, पथसंचलन, शांतता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

असा असणार बंदोबस्त तालुका व मोठ्या शहरामध्ये विसर्जन मार्गाची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे ४४ पोलीस अधिकारी, ७२७ पोलीस अंमलदार, १ एस.आर.पी.एफ प्लाटुन, आर.सी.पी.चे २ पथक व ६०० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. 

समाजोपयोगी उपक्रम राबवादुर्गादेवी व शारदादेवी मंडळ स्थापना करताना पोलीस विभागाकडून ऑनलाईन परवानगी घ्यावी. तसेच इतर विभागांकडूनही आवश्यक परवानगी घ्यावी. नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधित डी.जे. चा वापर न करता समाजोपयोगी व आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही कलासागर यांनी केले आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीNavratriनवरात्रीPoliceपोलिस