‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST2021-04-16T04:29:57+5:302021-04-16T04:29:57+5:30

थाळीचा लाभ घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची राबविलेली संकल्पना उत्तम आहे. खेड्यातून येणाऱ्यांना याचा लाभ मिळतो. मी ...

Due to ‘lockdown’ passed on; A plate of bread will be served | ‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी

‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी

थाळीचा लाभ घेणारे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची राबविलेली संकल्पना उत्तम आहे. खेड्यातून येणाऱ्यांना याचा लाभ मिळतो. मी नातेवाईकास रुग्णालयात आणले. ही योजना अशीच ठेवून जेवढ्या जास्त लोकांना लाभ देता येईल, तेवढा द्यावा.

शिवराज रावले, जवळा बाजार

सध्या संचारबंदी असल्याने बाहेर जेवण मिळत नव्हते. रुग्णालयातच शिवभोजनाचा लाभ मिळाल्याचा आनंद झाला. शासनाने ही व्यवस्था केल्याने त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

शिवाजी कदम, उमरखेड

माझ्या मुलीची प्रसूती झाली. मी तिच्या सेवेसाठी आली. जेवणाची अडचण असल्याने शिवभोजन केंद्रावर आली. येथे तर मोफत जेवण मिळाले. सरकारने असेच चांगले काम करावे.

पुंजाबाई मुटकुळे, हनवतखेडा

जिल्ह्यातल शिवभोजन थाळी केंद्र ९

दररोज किती जणांना देता येतो लाभ

१०००

रोज ९०० पेक्षा जास्त घेतात लाभ

या केंद्रांवर यापूर्वी संचारबंदी नसतानाही जवळपास ८०० ते ९०० लोकांना लाभ दिला जायचा. आता संचारबंदी आहे. बाहेर हॉटेल बंद आहेत. त्यामुळे यात आता लाभार्थीसंख्या वाढूही शकते. शिवाय मोफतच थाळी द्यायची असल्याने अनेकजण याचा लाभ घेतील, असे चित्र आहे.

Web Title: Due to ‘lockdown’ passed on; A plate of bread will be served