कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे ३२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:25+5:302021-05-07T04:31:25+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील २० पैकी १९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना वेळीच गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे ...

कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे ३२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
हिंगोली : जिल्ह्यातील २० पैकी १९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना वेळीच गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे ३२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
जिल्ह्यात लघु सिंचन विभागाच्या वतीने २० कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्याच्या माध्यमातून २ हजार ५० सघमी पाणीसाठा होणार असून यातून ४११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण, बंधारे ओसंडून वाहत होते. पावसाळ्यात पाणी वाहून गेले तरी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत व्हावी, यासाठी बंधाऱ्यांना गेट बसविण्याचे काम लघु सिंचन विभागाने हाती घेतले होते. जिल्ह्यातील २० कोल्हापुरी बंधाऱ्यांना ७५५ गेट आहेत. यातील १९ बंधाऱ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत गेट बसविण्यात आले. त्यामुळे १९ बंधाऱ्यात पाणी जमा होण्यास मदत झाली. बंधाऱ्यांना गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला. यातून जवळपास ३२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. दरम्यान, बंधाऱ्यातील पाण्याने सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघाला आहे.