शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचे गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:25 AM

दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. मोक्याच्या वेळी पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचा हंगाम हातचा गेल्याचे चित्र समोर आले.पालकमंत्र्यांसमवेत आ. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरीचे एसडीओ प्रशांत खेडेकर, कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार गजानन शिंदे, बीडीओ डॉ. मिलींद पोहरे, पोनि मारुती थोरात, भाजपचे रामरतन शिंदे, नगरसेवक गणेश बांगर, उत्तमराव जगताप, के.के. शिंदे, माधव कोरडे, बालाजी घुगे आदींसह अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.संतूक पिंपरी येथील एका शेतात पालकमंत्री दिलीप कांबळे लवाजम्यासह गेले होते. तेथे कपासीचे अत्यंत वाईट हाल होते. जेमतेम पाच ते पंधरा बोंडे होती. तर तूर जागीच वाळत होती. त्याला एकही फूल दिसत नव्हते. या शेताची मालकीण गंगासागर यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी आढळले की, सासºयाला अर्धांगवायू झाला. सासूचा अपघात झाल्याने पायात रॉड टाकला. पतीचे दहा वर्षांपूर्वीच मरण पावला. दोन मुलांसह कुटुंबाची गुजराण करण्याची जबाबदारी गंगासागर ज्ञानेश्वर झिप्परगे या महिलेवरच पडली आहे. त्यांना दोन एकरात दहा किलो कापूस झाला. आणखी एखादा क्विंटल होईल, अशी स्थिती आहे. दहा हजारांचा खर्च केला. तोही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. चाळीस ते पन्नास हजारांची मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. दुसºया शेतात एकरात दोन क्ंिवटल सोयाबीन झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही, असेही त्यांनी सांगितले. तर कोणी मार्गदर्शन करीत नाही. तरीही चाळीस ते पन्नास हजारांचे उत्पादन होते. यंदा मात्र खायचे हाल होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.तर राहोली शिवारातील शेतकरी त्र्यंबक बोरकर यांच्या शेतातही पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी बोरकर म्हणाले, आमचे यंदा मोठे हाल आहेत. सोयाबीनचा उतार चांगला आला नाही. तूरही हातची गेली आहे. खरीपची पिके गेली. आता रबी पीक काही येणार नाही. पाणीच नाही तर देणार कुठून? काहींनी वीजप्रश्नाचा मुद्दाही त्यांच्याकडे मांडला.त्यानंतर पालकमंत्र्यांनी केसापूर, काळकोंडी, नवलगव्हाण आदी भागात दौरा केला. यावेळी खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे यांनीही त्यांची भेट घेत वसमत व औंढा तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत घेण्याची मागणी केली. यावेळी विनायक देशमुख, बाबा नाईक, सुरेश सराफ, रवी पाटील आदी उपस्थित होते.पूर्ण दुष्काळ जाहीर करा : सातवहिंगोली : खरीप हंगामात उत्पादन खर्च देखील निघण्याची शक्यता नसतांना पाण्याअभावी रबीची अपेक्षाच करता येत नसल्याने लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केलीे.हिवाळ्यातच पाणीटंचाईचे सावट आहे. जनावरांसाठी चारा टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. कर्जमाफीत अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत.बोंडअळीचे अनुदानही शेतकर्यांना मिळालेले नाही. हमीभाव खरेदी केंद्रही अद्याप सुरू झालेले नाहीत.लोकसभा क्षेत्रात सर्व तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती असूनही प्रशासनाने चुकीची आणेवारी सादर केल्याने शेतकºयांना पीकविम्यापासून वंचित रहावे लागणार आहे. शासनाने मदत न केल्यास शेतकºयांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचेही सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीministerमंत्री