लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:32+5:302021-03-15T04:27:32+5:30
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एकच ब्लड बँक आहे. दुसरी खाजगी ब्लड बँक सध्यातरी जिल्ह्यात कार्यरत नाही. सध्या कोरोना ...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एकच ब्लड बँक आहे. दुसरी खाजगी ब्लड बँक सध्यातरी जिल्ह्यात कार्यरत नाही. सध्या कोरोना संसर्गाची लस देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ४५० ‘एमएल’ची एक बॅग असते. अशा जवळपास १५० बॅगा जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत आहेत. जिल्ह्यातील रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर तीन महिने तरी रक्तदान करू नये. कारण, रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या अंगी अशक्तपणा येतो. तेव्हा रक्तदात्यांनी काळजी घेणे गरजेेचे आहे. विशेष म्हणजे लस घेणाऱ्यांनीही रक्तदान करू नये. कारण, लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगात नाही म्हटले तरी काहीअंशी ताप असतो.
जिल्ह्यातील २९ शासकीय आरोग्य संस्थांत दररोज जवळपास ३९७ जणांना कोरोना लस दिली जाते. आतापर्यंत १२ हजार २४६ जण प्रगतीपथावर आहेत. जे रक्तदान करणारे आहेत, त्यांनी आधी लस घ्यावी व दोन-तीन महिन्यांनी रक्तदान केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी चांगले राहील, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आला आहे. ज्यांनी मार्च महिन्यात कोरोना लस घेतली आहे, त्यांनी एप्रिल, मे किंवा जून महिन्यात रक्तदान करावे.
बॉक्स
रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या अंगी अशक्तपणा येतो. त्यामुळे लस घेण्याची त्याने घाई करू नये. दुसरीकडे डोस घेणाऱ्यांनी २८ दिवसांपर्यंत थांबणे गरजेचे आहे. लस न घेणाऱ्यांना रक्तदान करता येते. जिल्ह्यात खाजगी ब्लड बँक नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन रक्तदान करता येते.
-डाॅ. दीपमाला पाटील, ब्लड बँकप्रमुख, जिल्हा रुग्णालय, हिंगोली