दारु दुकानास परवानगी देऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:07 AM2018-10-21T00:07:26+5:302018-10-21T00:07:50+5:30

औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

 Do not allow ammunition shops; Appeal to District Collector | दारु दुकानास परवानगी देऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दारु दुकानास परवानगी देऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
औंढा नागनाथ हे धार्मिक ठिकाण असल्याने देशभरातून भाविक औंढा येथे येतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने सर्व धर्मातील समाजबांधव एकत्र जमतात. त्यामुळे नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवाना देऊ नये, शिवाय स्थानिक प्रशासनास सुद्धा तसे निर्देेशित करून नवीन बार व शॉपी मंजूर करू नयेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्ककडे करण्यात आली आहे. औंढा नागनाथ येथे सर्वधर्मीय लोक एकत्रित राहतात. त्यामुळे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष घालावे. तसेच यापुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबधित अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शेख निहाल तसेच मोठ्या संख्येने नागरिक निवेदन देण्यासाठी जिल्हा कचेरीवर जमले होते.

Web Title:  Do not allow ammunition shops; Appeal to District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.