शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

जि.प.त ३४२ विहिरींसाठी होणार सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:31 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख यांनी दिली.विशेष घटकमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना लाभ देता येतो. यात विहिरीसाठी २.९0 लाखांचे अनुदान देता येते. तर इतर साहित्यासह ३.४0 लाखांपर्यंतच्या लाभाची तरतूद आहे. तर जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी एक लाखापर्यंतचा निधी देता येतो. याशिवाय इतर बाब या सदरात साहित्य खरेदीसाठी ५0 हजारांपर्यंतच्या निधीची तरतूद करणे शक्य आहे. अशाच प्रकारच्या अटी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतही आहेत. यामध्ये स्वावलंबनसाठी यंदा १0.१७ कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद आहे. यातील ८५ टक्के म्हणजे ८.६४ कोटी रुपयांचा निधी नवीन विहिरींना देता येणार आहे. यात २८९ लाभार्थी निवडणे शक्य आहे. तर १0 टक्के निधी जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ठेवला जाणार असून १ कोटी एक लाखात ९७ लाभार्थ्यांना लाभ देणे शक्य आहे. तर इतर बाबसाठी ५0 लाख उरणार असून यामध्ये ५0 जणांना लाभ देणे शक्य आहे.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत १.८0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यात नवीन विहिरीसाठी ८५ टक्क्यांप्रमाणे १.५३ कोटी मिळणार असून ५३ लाभार्थी देणे शक्य आहे. १0 टक्के जुनी विहिरी दुरुस्तीसाठी असून यात १९ लाभार्थ्यांना लाभ मिळणे शक्य आहे. तर इतर बाब म्हणून साहित्य खरेदीसाठी ठेवलेल्या ५ टक्के निधीत ९ लाखांमध्ये १९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.नवीन विहिरींसाठी डॉ.आंबेडकर कृषी स्वावलंबनमध्ये औंढा ६५, वसमत-७८, हिंगोली-६६, कळमनुरीगल९ तर सेनगाव तालुक्यात ४१ लाभार्थ्यांची निवड होणार आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत नवीन विहिरींचे औंढा-२४, वसमत-६, हिंगोली-४, कळमनुरी-१५ व सेनगावात ४ लाभार्थी निवडले जाणार आहेत. या सोडतीसाठी जिल्हा परिषदेत जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदzpजिल्हा परिषद