जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढू लागले आहेत. असे असताना मात्र पंचायत समिती परिसरात मात्र विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे पहायला मिळत आहे. विना मास्क फिरणाऱ्यांना दंड लावण्यासाठी नगर परिषद व पोलीस विभागाच्या संयुक्त विभागाने पथकाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, नेमलेले हे पथक पं. स. कार्यालय परिसरात का येत नाह? हा प्रश्न आहे.
‘त्या’ नियमांचे पालन होईना
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने विना मास्क फिरु नका, विनाकारण बाजारपेठेत फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्या तरी पं. स. परिसरात मात्र अनेक जण विनामास्क फिरताना मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आढळून आले.
फोटो नं. २३