पुसेगावचा विद्युत पुरवठा खंडीत; पिके धोक्यात
By Admin | Updated: October 22, 2014 13:40 IST2014-10-22T13:40:29+5:302014-10-22T13:40:29+5:30
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही केंद्राचा कारभार संबंधित अभियंता जिल्ह्यावरुन पाहत असल्याने वारंवार या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे.

पुसेगावचा विद्युत पुरवठा खंडीत; पिके धोक्यात
पूसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही केंद्राचा कारभार संबंधित अभियंता जिल्ह्यावरुन पाहत असल्याने वारंवार या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे ग्रामस्थाना अंधाराचा सामना करावा लागत असून शेतकर्यांना पिकांना पाणी देणे कठीण होऊन बसले आहे.
पुसेगाव येथे ३३ के.व्ही.उपकेंद परिसरात काही दिवस सुरळीत वीज पुरवठा सुरु होता. परंतु मागील काही दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडीत होणे सुरु झाल्याने शेतकर्यांसह ग्रामस्थातून नाराजीचे सुरु निघत आहेत. येथे कार्यरत असलेले अभियंता उंटावरुन शेळ्या राखल्या प्रमाणे कारभार पाहत आहेत. परिणामी ३३ के. व्ही. चा कारभार दिवसेंदिवस ढेपाळतच चालला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांकडे मागणी केली आहे. पुसेगावची लोकसंख्या जवळपास १0 हजार असून मोठे बाजारपेठेचे गाव आहे. जि. प. सर्कलसुद्धा आहे. दररोज १0 ते १५ खेड्यांचा संबंध येतो. पुसेगावच्या ३३ के.व्ही.चा वारंवार सांगूनही विद्युत पुरवठा वारंवार खंडीत राहतो. ज्या शेतकर्यांच्या विहिरीला पाणी आहे ते शेतकरी कापसाला व इतर पिकांसाठी पाणी देत आहेत. पण विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी पाणी सुद्धा देत नाहीत. पुसेगावची वीज वसूली ९९ टक्के असून सुद्धा विद्युत पुरवठा खंडीत होतो. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)