शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सातबारावर येणार आता डिजिटल स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:46 IST

हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सातबारांची दुरुस्तीही सोबतच केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सातबारांची दुरुस्तीही सोबतच केली जात आहे.हिंगोली जिल्ह्यात महसुली गावांची संख्या ६९८ एवढी आहे. यात हिंगोली-१४९, सेनगाव-२८, कळमनुरी-१४८, औंढा १५१ अशा पूर्णच गावांचे सातबारा अद्यायावतीकरण झाले. मात्र वसमत तालुक्यातील १५१ पैकी केवळ वसमतचेच काम बाकी आहे. जिल्ह्यात सर्व सर्वे क्रमांकानुसार सातबारांची संख्या १ लाख ८0 हजार ६१0 एवढी आहे. यात हिंगोली-४00३0, औंढा ना-२७५५८, कळमनुरी-३६४३३, वसमत-३६४२६ व सेनगावात ४0१६३ एवढी सातबारांची संख्या आहे. या सर्व सातबारांवर आता त्या-त्या सज्जाच्या तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरी येणार आहे. एकूण १७६ तलाठी सज्जे असून त्यापैकी जवळपास दहा पदे रिक्त आहेत. उर्वरित सज्जांना तलाठी असल्याने त्यांनी आता डिजिटल स्वाक्षरी सातबाराला जोडण्याचे काम सुरू केले आहे.या कामालाही लवकरच चांगली गती येणार आहे.तलाठ्यांचा प्रातिनिधीक सत्कारजिल्ह्यातील सर्वच तलाठ्यांनी सातबारा संगणकीकरणात मोलाची भूमिका बजावली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यात काम न करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला होता. त्यामुळे तलाठ्यांनी या कामाला गती दिली. त्याचा परिणाम म्हणून आता वसमत हे एकमेव शहर सातबारा संगणकीकरण न झालेले आहे. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाºया तलाठ्यांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात १ मे रोजी प्रत्येक तालुक्यातील पाच तलाठ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.१ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सातबारा संगणकीकरणाचा सत्कार कार्यक्रमही आहे. तर क्रीडा विभागाच्या पुरस्कारांत गुणवंत खेळाडू म्हणून शीतल सुरेश चव्हाण यांना प्रमाणपत्र व ५ हजारांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.गुणवंत क्रीडा मार्गदर्शक रामप्रकाश व्यवहारे व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता शिवाजी श्रावण इंगोले यांनाही स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व दहा हजारांचा धनादेश प्रदान होईल. जिल्हा युवा संस्था पुरस्कार सद्भाव सेवाभावी संस्थेचे अभय भारतिया यांना प्रदान केला जाणार आहे.यंदाचा आदर्श तलाठी पुरस्कार औंढा नागनाथ तालुक्यातील माथा सज्जाचे व्ही.व्ही. मुंढे यांना १ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. प्रमाणपत्र, पाच हजार रुपये असे त्याचे स्वरुप आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीonlineऑनलाइन