वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:55+5:302021-01-08T05:37:55+5:30
पथदिवे बंदच अवस्थेत बासंबा : सध्या गावात निवडणुकीचे काम वेगात आले आहे. पण गावातील पथदिवे दुरूस्तीच्या काम रखडलेल्या अवस्थेत ...

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पथदिवे बंदच अवस्थेत
बासंबा : सध्या गावात निवडणुकीचे काम वेगात आले आहे. पण गावातील पथदिवे दुरूस्तीच्या काम रखडलेल्या अवस्थेत आहे. कोणालाही पथदिव्याकडे पहायला वेळ मिळत नाही. यासाठी पथदिवे लवकरात लवकर दुरूस्त करावे, अशी मागणी होत आहे.
बस सुरू करण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे गावातून गांगलवाडी - खिल्लार धावणारी बस बंद असल्याने परिसरातील गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. या भागातील नागरिकांची नेहमी हिंगोलीकडे जाण्यासाठी वर्दळ आहे. परंतु, बस सुरु केली जात नाही. इतर खासगी वाहने जास्तीचे दर आकारत आहेत. परिसरातील प्रवाशी वर्ग हिंगोली ते गांगलवाडी, खिल्लार ही बस सुरू करण्याची मागणी करीत आहे. तेव्हा एस. टी. महामंडळाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
खुडज फाटा परिसरात गतिरोधकाची मागणी
खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज फाटा परिसरात नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या नवीन रस्त्यावरुन अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहे. या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यासाठी गावातील फाटा परिसरात गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे.
गावातील रस्त्यावर खड्डेच खड्डे
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात मुरूमाचे रस्ते आहेत. या मुरुमाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे गावातील वाहनधारकांना आपले वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. गावात अनेक रस्त्यांसह मुख्य रस्त्यावरही खड्डे पडले असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यासाठी सदरील खड्ड्यांची दुरूस्तीची मागणी गावकरी करीत आहे.
पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
आंबाचोंडी : वसमत तालुक्यातील आंबाचोंडी गावातून अकोला - पूर्णा ही धावणारी पॅसेंजर रेल्वे गाडी कोरोनाच्या काळापासून बंद आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महामंडळच्या बस किंवा खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. या प्रवास रेल्वे गाडीच्या तिकीटाच्या तुलनेते दुप्पट व तिप्पट असल्याने नागरिकांतून पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.