वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST2020-12-24T04:26:45+5:302020-12-24T04:26:45+5:30
डिग्रस कऱ्हाळे येथील एजी शेतशिवारात आजपर्यंत ७० डी.पी. असून शासन नियमाप्रमाणे येथील शेतकरी नियमित वीजबिलाचा भरणा करतात. तसेच लिंबाळा ...

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे येथील एजी शेतशिवारात आजपर्यंत ७० डी.पी. असून शासन नियमाप्रमाणे येथील शेतकरी नियमित वीजबिलाचा भरणा करतात. तसेच लिंबाळा ३३ उपकेंद्रातून दोन फिडर आहेत. या फिडरवर १५ गावांला वीजपुरवठा केला जातो. अतिरिक्त भार हाेत असल्याने बिघाड हाेत आहे. त्यामुळे डिग्रस कऱ्हाळे शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित हाेत आहे. २०१८ साली नवीन फिडरचे काम करण्यात आले. त्यामध्ये अनेकवेळा बिघाड हाेत आहे. यामुळे कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधला असता ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा असे सांगत आहेत.
वीजबिल वसुलीत डिग्रस गाव हे जिल्ह्यात अव्वल राहिले आहे. मात्र, सतत वीजपुरवठा खंडित हाेणे, बिघाड हाेत असल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. यामुळे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. निवेदनावर शिवाजी कऱ्हाळे, बापूराव कऱ्हाळे, साहेबराव कऱ्हाळे, शेषराव कऱ्हाळे, गोविंदराव कऱ्हाळे, गजानन कऱ्हाळे, तुकाराम बाऱ्हाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.