आरोग्य सेवकांना मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:25 IST2018-12-24T00:25:00+5:302018-12-24T00:25:39+5:30
जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

आरोग्य सेवकांना मानधन देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यासोबत आरोग्य सेवकही कर्तव्य बजावत आहेत. परंतु आरोग्य सेवक सदर मोहिमेतील महत्त्वाचा घटक असून त्यांना योगदान देऊनही मानधन दिले जात नाही. त्यामुळे गोवर-रूबेला मोहिमेत योगदान देणाºया आरोग्य सेवकांनाही मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, एसएमओ, डब्ल्यूएचओ विभाग औरंगाबाद आदींना निवेदन दिले. दुजाभाव न करता मानधन देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आरोग्याधिकाºयांना निवेदन देताना बबन कुटे, हरिचंद्र गोलाईतकर, नंदकिशोर कोकाटे, राजरत्न पुंडगे, नाना पारटकर, मंगेश चव्हाण, इंगळे आदी हजर होते.