महाशिवरात्रीच्या दिवशी फळांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:23+5:302021-03-13T04:54:23+5:30
हिंगोली: इतर फळांच्या तुलनेत रताळी या फळाची आवक वाढल्याने महाशिवरात्रीला रताळीचा भाव घसरल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळाले. दरवर्षी ३० ते ...

महाशिवरात्रीच्या दिवशी फळांना मागणी
हिंगोली: इतर फळांच्या तुलनेत रताळी या फळाची आवक वाढल्याने महाशिवरात्रीला रताळीचा भाव घसरल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळाले. दरवर्षी ३० ते ३५ रुपये किलोने विक्री होणारी रताळी २० रुपये किलोने विक्री झाले.
महाशिवरात्र पाच-सहा दिवसांवर येऊन असता रताळी विक्रीसाठी बाजारात येत असतात. परंतु, यावेळेस महाशिवरात्र दोन दिवसांवर राहिली असताना रताळी बाजारात दाखल झाले होते. शहरातील चौकाचौकांमध्ये रताळीचे गाडे उभे असल्याचे पाहायला मिळाले. उत्पन्न जास्त असल्याने २० रुपये किलोने रताळे विक्री झाले. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन जाणवायला सुरुवात झाली आहे. अंगूर, टरबूज, खरबूज, चिकू, सफरचंद, अननस, मोसंबी, नारळ पाणी आदी फळांचे गाडे वर्दळची रस्ते व चौकाचौकात थाटली गेली आहेत. अंगूर, चिकूची आवक वाढली असली तरी इतर फळांची आवक मात्र अजूनही वाढली नाही. त्यामुळे महाशिवरात्रीला फळांना सर्वच फळांना चांगलीच मागणी होती. महाशिवरात्रीचा उपवास आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांकडून फळांना मागणी होत होती. कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढत असतानाही महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली.
महाशिवरात्री बाजारपेठेत अंगूर ८० रुपये किलो, टरबूज २५ रुपये, चिकू ६० रुपये किलो, खरबूज ३० रुपये किलो, नारळ पाणी ४० रुपयास एक, केळी ३० रुपये डझनप्रमाणे विक्री झाली.
शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेडनाका, बसस्थानक परिसर, रिसाला चौक, खटकाळी, औंढा रोड आदी वर्दळीच्या ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी फळांचे गाडे उभे केले होते.
बॉक्स
दोन-तीन दिवसांपासून अंगूर फळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाची तीव्रता आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेता छोट्या विक्रेत्यांनी अंगूरची खरेदी केली आहे. जे छोटे व्यापारी सफरचंद विकायचे ते आता ग्राहकांची मागणी पाहून अंगूर विकायला लागले आहेत. १०-१२ दिवसांपूर्वी अंगूरची आवक कमी होती. त्यावेळेस ६० रुपये किलोने अंगूर विक्री होत होते. गुरुवारी महाशिवरात्र व वाढते उन्ह पाहता अंगूर ८० ते ९० रुपये किलोप्रमाणे विक्री झाले. ग्राहकांकडून अंगूरला चांगली मागणी होती.
- शकील बागवान, फळ विक्रेता