शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांच्या पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

हिंगोली जिल्ह्यात मागच्या महिन्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. त्यात जिल्ह्यात मार्च महिन्यात २९ हजार ८०७ जणांच्या चचण्या केल्या होत्या. ...

हिंगोली जिल्ह्यात मागच्या महिन्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. त्यात जिल्ह्यात मार्च महिन्यात २९ हजार ८०७ जणांच्या चचण्या केल्या होत्या. त्यात २४५२ रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटीचा दर ८.२२ टक्के होता. एप्रिल महिन्यात २० हजार ६०० चाचण्या झाल्या. ३६४३ रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी दर १७ टक्के होता. मे महिन्यात मागील चार दिवसांचा विचार केला तर चाचण्यांची संख्या घटली असून पॉझिटिव्हिटी दर मात्र २५ टक्क्यांवर आहे.

आता वाढू लागल्या ग्रामीण भागात चाचण्या

पूर्वी कोरोनाचा कहर शहरी भागात जास्त होत्या. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही शहरी भागात तुलनेने जास्त होते. आता ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले आहेत. अनेक गावांमध्ये अँटिजेन तपासणीचे कॅम्प लावण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागातील चाचण्यांचे प्रमाण सध्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व गावातही चाचण्या करून घेण्याची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील वाढत्या संसर्गामुळे नागरिक हळूहळू जागरुक होत असून कोरोनाची तपासणी करून घेण्याकडेही कल वाढला आहे. त्यातच काही गावांत एकमेकांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्याही होऊ लागल्या आहेत.

आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह

जिल्ह्यात अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. अँटिजेन चाचण्यांमध्ये तरी काही ठिकाणी कोणतीही लक्षणे नसलेले तपासणी करून घेत आहेत.

आरटीपीसीआरमध्ये मात्र ज्यांना खरोखरच काहीतरी त्रास आहे आणि कोरोनाची जवळपास लक्षणे दिसू लागली आहेत असेच रुग्ण तपासणी करताना दिसतात, तर जास्त विश्वासार्ह म्हणून आरटीपीसीआरकडे कलही जास्त आहे.

ग्रामीण भागातही चाचण्या

शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सध्या ग्रामीण भागातच रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. तर जेथे रुग्ण वाढताहेत असे दिसते, त्या गावात थेट कॅम्प लावला जात आहे.

-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी