शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

हिंगोली : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. ...

हिंगोली : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी शहरात फळ भाजीविक्रेत्यांसह शेतकऱ्यांना आठ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर येथून व्यवहार चालणार असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.

जिल्ह्यासह हिंगोली शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी संचारबंदीची मुदत संपली असून, संचारबंदी शिथिल झाल्यानंतर मुख्य बाजारपेठेत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील मुख्य भाजीमंडईमध्येही होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. शहरात आठ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असून, यात सहा ठिकाणी फळ-भाजीविक्रेत्यांना, तर दोन ठिकाणी विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी तसेच ग्राहकांना उभे राहण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत. विक्रेते व ग्राहकांची गर्दी होणार नाही, नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्य भाजीमंडईमधील स्थायी दुकाने वगळता इतर फळ-भाजीविक्रेते, फेरीवाले हे भाजीमंडईमधील रोडवर किंवा रोडलगत व्यवसाय करणार नाही, याबाबत दैनंदिन पाहणी करण्यासाठी एका पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फळ-भाजीविक्रेत्यांसाठी जागा

-जिल्हा परिषद बहुविध प्रशाला मैदान

-खटकाळी बायपास परिसर रोडलगत

-रेल्वे स्टेशन मैदान

-नवीन नगर पालिका इमारत ते बिरसा मुंडा चौकापर्यंत डाव्या बाजूच्या रोडलगत

-जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेलगतचा रोड

-स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी सभागृहाच्या संरक्षण भिंतीलगत, मंगळवारा

विकेल ते पिकेल योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागा

-अग्रसेन चौक ते एमजेपी टँकरोड डाव्या बाजूला रस्त्याच्या लगत

-तहसील कार्यालय सुरक्षा भिंतीलगत

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई

संचारबंदी शिथिल झाल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या काळातही व्यावसायिक, ग्राहकांना नियमित मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना व्यापारी, ग्राहकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

फोटो: