शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

आजेगावात दोन गटांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:03 AM

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी बॅनर, ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनुसार १६३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी बॅनर, ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनुसार १६३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, सपोनि रवींद्र सोनवणे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटातील पुरूष व महिलांचा जमाव ठाण्यात तक्रार दाखलसाठी आला होता. यातील मारोती गुणाजी चाटसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री ८.४५ वाजता विरोधी गटातील ६१ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.लक्ष्मण त्र्यंबक दळवी यांनी दिलेल्या विरोधी गटांतील १०२ जणांविरूद्ध भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बसचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालक संतोष बगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २५ अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. येथील दोन गटातील प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्याने याठिकाणी मोठा जमाव जमला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा पोलीस प्रशासनाकडून कसून शोध घेतला जात आहे.या गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी आजेगाव येथे भेट दिली. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन केले. या घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसह संबंधित दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दोन्ही बाजूंनी विविध प्रकारच्या आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.