विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:50 AM2018-09-11T00:50:21+5:302018-09-11T00:50:25+5:30

कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

 The death of four sisters by clamping the electric wires | विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
करवाडी शिवारातील रंगराव चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा ८ सप्टेंबर रोजी रात्री तुटून जमीनीवर पडल्या. त्यानंतर शेतातील पीक खाण्यासाठी आलेल्या रोही या वन्यप्राण्यांचा तारांना स्पर्श झाल्याने चार रोहिंचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग व महावितरण कंपनीला कळवले असता, दिवसभर कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे वनविभाग व महातवितरणविरोधात शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.
परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मनुष्य वसाहतीत या तारा तुटल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे या तारा व्यवस्थित ताणण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे. अनेकदा महावितरण अधिकाºयांनी याबद्दल सांगितले पण कुणीही मनावर घेत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
परिसरात रोहींबरोबरच हरण, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे. हे वन्यप्राणी शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत. याकडे वन विभाग डोळे बंद करुन बसला आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title:  The death of four sisters by clamping the electric wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.