भाविकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:36 IST2018-06-13T00:36:27+5:302018-06-13T00:36:27+5:30
तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या औंढा येथील भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ११ जून रोजी घडली.

भाविकाचा मृत्यू
औंढा नागनाथ: तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या औंढा येथील भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ११ जून रोजी घडली. औंढा येथील भाविक रघुनाथ देशमुख यांना रविवारी हृदयविकाराचा झटका आला. सोबत असलेल्या साहेबराव देशमुख, ममलेश देशमुख यांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले; उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वा. निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.