वाळकी शिवारात आढळेला मृतदेह पूर्णा तालुक्यातील युवकाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:49 IST2020-02-04T17:48:09+5:302020-02-04T17:49:48+5:30
सोशल मिडीयाच्या सहाय्याने पटली ओळख

वाळकी शिवारात आढळेला मृतदेह पूर्णा तालुक्यातील युवकाचा
औंढा नागनाथ: पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळकी शिवारात कुजलेल्या अवस्थेमध्ये अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह पूर्णा तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
मृतदेह कुजला असल्याने जाग्यावरच पोस्टमार्टम करण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृताचे कपडे , शारीरिक वर्णन आदींच्या सहाय्याने मृताची ओळख पटविण्यासाठी शोध मोहीम राबवली. सोशल मिडिया, पोस्टर यामुळे मिळालेल्या माहिती वरून पूर्णा येथील मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृताचे नाव संदेश ढगे ( रा ,धनगर टाकळी ता ,पूर्णा )
असे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली आहे. ओळख पटविण्याचे किचकट काम पूर्ण झाल्याने आता खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.