व्यसनमुक्ती चळवळीला गती मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:40+5:302021-01-08T05:37:40+5:30
वसमत: कुप्रतिष्ठित मद्य संस्कृतीला आदराचे स्थान निर्माण झाल्याने व्यसनमुक्ती चळवळीला गती प्राप्त करून देण्याची आवश्यकता असल्याचा सूर व्यसनमुक्ती चर्चासत्रात ...

व्यसनमुक्ती चळवळीला गती मिळावी
वसमत: कुप्रतिष्ठित मद्य संस्कृतीला आदराचे स्थान निर्माण झाल्याने व्यसनमुक्ती चळवळीला गती प्राप्त करून देण्याची आवश्यकता असल्याचा सूर व्यसनमुक्ती चर्चासत्रात उमटला.
स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ आणि नशाबंदी मंडळ यांच्या वतीने दारू, मद्य कुटुंबासाठी घातक या विषयावर व्यसनमुक्ती चर्चासत्र वसमत येथील सर्वोदय कार्यालयात पार पडले. सर्वोदयचे माजी प्रदेशमंत्री विशाल अग्रवाल, नशाबंदी मंडळाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षा शुभदा सरोदे, माजी प्राचार्य के. व्ही. महाजन, व्ही. डी. बेंडके, केरबा अवधूतवार, सदाशिव अडकिने, कमलकिशोर सोनी, शाहीर एल. जी. खंदारे, गंगाधर उबारे यांची उपस्थिती होती. प्रारंभी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यसनमुक्तीपर गीतेही सादर करण्यात आली.
अध्यक्षस्थानी शुभदा सरोदे या होत्या. व्यसनमुक्तीसाठी समाजमाध्यमाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येतात. मनाचा संकल्प आणि प्रबोधनाशिवाय पर्याय नसल्याचे चर्चासत्रातून स्पष्ट झाले. ‘द’ दारूचा नसून ‘द’ दुधाचाच. अशी शिकवण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. येत्या वर्षभरात व्यसनमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यांचे विपुल प्रमाणात संघटन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी सांगितले. आदरांजली व्यक्त करताना गंगाप्रासद अग्रवाल यांच्या जीवनावर सर्वेादय कार्यकर्त्यांनी प्रकाश टाकला.
फोटो आहेत