सात कर्मचाऱ्यांवर सायबर सेलचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:21+5:302021-03-13T04:54:21+5:30

हिंगोली : ऑनलाईन कामामुळे वेळ व पैशांची बचत होत असली, तरी धोकाही वाढला आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. ...

Cyber cell dollars on seven employees | सात कर्मचाऱ्यांवर सायबर सेलचा डोलारा

सात कर्मचाऱ्यांवर सायबर सेलचा डोलारा

हिंगोली : ऑनलाईन कामामुळे वेळ व पैशांची बचत होत असली, तरी धोकाही वाढला आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. मात्र असे प्रकार उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सायबर सेलकडे कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने तपासाला उशीर होत असल्याचे चित्र आहे.

आज प्रत्येकाकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल आला आहे. सर्व कामे ऑनलाईन होत असल्याने वेळ वाचत आहे. मात्र फेक आकाऊंट तयार करून समोरच्या व्यक्तीला फसविण्याचे प्रकारही समोर येत आहेत. अशा प्रकारातील गुन्हेगार शाेधण्यात सायबर सेल महत्त्वाची भूमिका बजावते. ऑनलाईन फसवणूक झाल्यास अशा तक्रारी १५ दिवसांत निकाली काढण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी सायबर सेलकडे कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असून, यामुळे तपासाला गती येत नसल्याची स्थिती आहे. येथील सायबर सेलकडेही केवळ सातच कर्मचारी असून, अधिकाऱ्यांचा पदभारही प्रभारीवर सोपविण्यात आला आहे. जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण कमी असले, तरी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने गुन्हेगार शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तक्रारी दाखल

जानेवारी - १

फेब्रुवारी -१

मार्च- १

एप्रिल - ०

मे - ०

जून - ०

जुलै - ०

ऑगस्ट - ०

सप्टेंबर - ०

ऑक्टोबर -०

नोव्हेंबर -०

डिसेंबर -०

सायबर सेलची सद्यस्थिती

एकूण मनुष्यबळ - ८

अधिकारी - १

कर्मचारी - ७

फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या गतवर्षात - ३

तक्रारी अद्याप पेंडिंग - ३

किती तक्रारी दाखल, किती पेंडिंग

जिल्ह्याचे क्षेत्रफळ इतर जिल्हयांच्या् तुलनेत कमी असून, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही फारसे घडत नसल्याचे चित्र आहे. यामागे कारणे वेगवेगळी असली, तरी जिल्ह्यातील नागरिकांचा भरवसा ऑफलाईन कामावरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २०२० या वर्षात केवळ ३ तक्रारी फसवणुकीच्या दाखल झाल्या आहेत. या तक्रारींचा निपटारा झाला नसला, तरी तपास सुरू असल्याची माहिती सायबर सेलमधून देण्यात आली.

सर्वाधिक तक्रारी

२०२० या वर्षात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी एक तक्रार फसवणुकीची दाखल झाली आहे. यात एटीएम, लोन मंजूर करणे या फसवणूक प्रकारांचा समावेश आहे.

सायबर सेल प्रमुखाचा कोट

जिल्ह्यात २०२० मध्ये फसवणुकीच्या ३ तक्रारी दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या तक्रारीचा निपटारा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती सायबर सेलमधून देण्यात आली.

Web Title: Cyber cell dollars on seven employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.