शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटप केवळ ७.७९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:07 IST

जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने १७ हजार ७८ शेतकऱ्यांना ७४.७0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. महसूलच्या संपर्क अभियानाने चार्ज झालेल्या बँका पावसामुळे पुन्हा मरगळल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने १७ हजार ७८ शेतकऱ्यांना ७४.७0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. महसूलच्या संपर्क अभियानाने चार्ज झालेल्या बँका पावसामुळे पुन्हा मरगळल्याचे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात यावर्षी कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकºयांना नव्याने कर्ज मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी अजूनही बँकांमध्ये खेटे मारत आहेत. जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ हजार २१२ शेतकºयांना २१३0 लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपाचे या बँकेला १३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टाच्या केवळ १५.६६ टक्के कर्जवाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ३0९५ शेतकºयांना ३१२७ लक्ष रुपये कर्ज वाटप केले. ७२0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना ४.३४% उद्दिष्टच पूर्ण केले आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सर्वाधिक २१ टक्के कर्ज वाटप केले. या बँकेला एकशे तीन कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आह.े बँकेने २ हजार ७७१ शेतकºयांना २२१३ लक्ष रुपयांचे कर्जवाटप केले आहे. एकंदर जिल्ह्यात ९५९ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना या बँकांनी ७५ कोटी रुपये एवढेच कर्ज वाटप केले आहे. मराठवाड्यात सर्वात मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये हिंगोलीचा समावेश आहे. जवळपास १३ ते १५ टक्के कर्ज वाटप झाल्याचे इतर जिल्ह्यांचे आकडे असताना हिंगोलीत मात्र वेगळे चित्र आहे.महसूल विभागाने हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपास गती यावी. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक उपजिल्हाधिकारी संपर्क अधिकारी म्हणून नेमला आहे. त्यानंतर पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती आल्याचे दिसत होते. मात्र ही गती पुढे कायम राहिली नसल्याचे आता प्रत्यक्ष आकडेवारीवरूनदिसून येत आहे. यामध्ये पूवीर्पेक्षा थोडीबहुत सुधारणा झाली, हेही तेवढेच खरे. मागील पाच ते सहा दिवसांत पावसामुळे शेतीची कामे करता येत नसल्याने शेतकरी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात चकरा मारताना दिसत होते. मात्र त्यांना रिकामेच परतावे लागत आहे.जिल्हाधिकाºयांनी संपर्क अधिकाºयांना आदेश दिल्यानंतर एकेकच बैठक झाली. काहींनी तर तीही तसदी घेतली नाही. त्यामुळे पीककर्ज वाटपाचा टक्का वाढीसाठी संपर्क अधिकारीही तोकडे पडताना दिसत आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी