तिर्रट खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST2021-09-18T04:32:14+5:302021-09-18T04:32:14+5:30

वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे एका ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस ...

Crimes registered against 13 gamblers | तिर्रट खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल

तिर्रट खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल

वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे एका ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या पथकाने १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तिर्रट नावाच्या जुगारअड्ड्यावर छापा टाकला. या वेळी १३ जण जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी सपोनि सुनील गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून गणेश नागनाथ चटणे, शुभम जनार्दन क्यादलवार, मानेजी नागोराव मोरे, तुषार शिवाजीराव दळवी, संदीप बंडू इंगोले, शफिक उस्मान कुरेशी, बंटी दिलीपराव इंगोले, बबन दामोदर जटाळे, प्रमोद हरिभाऊ साखरे, गंगाप्रसाद दगडू गुडदेवार, शेख समीर शेख इब्राहिम, अजय कैलास साखरे, हरिदास प्रभाकर बुचाले (सर्व रा. कुरूंदा) याचेविरुद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक जोगदंड करीत आहेत.

Web Title: Crimes registered against 13 gamblers