तिघांवर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:56 IST2018-05-12T00:56:59+5:302018-05-12T00:56:59+5:30
तालुक्यातील सिनगी नागा येथील एका १६ वर्षीय तरुणीचे गावातील तीन युवकांनी ९ मेपूर्वी फोटो काढून सदर फोटोची छेडछाड करीत बदनामी करण्याचा प्रयत्न करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तिघांवर विनयभंगाचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील सिनगी नागा येथील एका १६ वर्षीय तरुणीचे गावातील तीन युवकांनी ९ मेपूर्वी फोटो काढून सदर फोटोची छेडछाड करीत बदनामी करण्याचा प्रयत्न करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सिनगी नागा येथील एका १६ तरुणीचा ९ मेपूर्वी (वेळ निश्चित नाही) हिचा गावातील शंकर भगवान गिते याने पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न केला. तिने बोलण्यास नकार दिल्याने गिते याने गावातील किरण भाऊराव कांबळे, अनिल चंद्रकांत कांबळे यांच्या मदतीने तरुणी व तिच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याचा उद्देशाने काढलेल्या फोटोसोबत बनावटपणा करुन अनिल कांबळेच्या मदतीने तो प्रसारित केल्याची घटना घडली. या प्रकाराचा आरोपीला जाब विचारणाऱ्या तरुणीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी १० मे रोजी बदनामी करणे, बाल लैंगिक अत्याचार कायदा, अॅट्रासिटी कायदा, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.