सुधाकर वाढवेविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:25 IST2018-03-22T00:25:53+5:302018-03-22T00:25:53+5:30
येथील बंजारा बारमध्ये जावून तुम्ही बनावट दारू विकता, मी पत्रकार आहे, मला पाच हजार महिना हप्ता द्या, अशी मागणी करणाऱ्या तोतयाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुधाकर वाढवेविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील बंजारा बारमध्ये जावून तुम्ही बनावट दारू विकता, मी पत्रकार आहे, मला पाच हजार महिना हप्ता द्या, अशी मागणी करणाऱ्या तोतयाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत रेल्वेस्थानक मार्गावर असलेल्या जुन्या बंजारा बारमध्ये १९ मार्च २0१८ रोजी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तर गुन्हा दाखल करण्यास गेल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व पेपरला खोटी बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत संदीप जगन्नाथ बांगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर वाढवेविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फौजदार गोमासे या पुढील तपास करीत आहेत. यापूर्वीही संबंधित आरोपीने अनेकांना धमकावल्याची चर्चा आहे.