१५ लाख रुपायांच्या अपहारप्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST2021-01-21T04:27:47+5:302021-01-21T04:27:47+5:30

शहरातील आदर्शनगर येथे ओडिसा राज्यातील अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून बचतगटांना कर्ज दिले जाते. वाटप ...

Crime against an employee of a finance company for embezzling Rs 15 lakh | १५ लाख रुपायांच्या अपहारप्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

१५ लाख रुपायांच्या अपहारप्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

शहरातील आदर्शनगर येथे ओडिसा राज्यातील अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून बचतगटांना कर्ज दिले जाते. वाटप केलेल्या कर्जाची हप्तेवारीनुसार परतफेड घेतली जाते. बचतगटांकडून कर्जाच्या परतफेडीची रक्कम नियमित जमा झाल्यानंतर ही रक्कम बँकेत जमा केली जाते. ९ व १० जानेवारी रोजी साडेआठरा लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम १० जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी बँकेतील चौघांच्या समक्ष तिजोरीत ठेवण्यात आली होती. मात्र ११ जानेवारी रोजी सकाळी सदरील रक्कम तिजोरीत आढळून आली नाही. त्यामुळे या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मनोज पांडे, नितीन केनेकर, जमादार सुधीर ठेंबरे, गजानन होळकर, शेख मुजीब, दिलीप बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता तिजोरीच्या चाव्या कर्मचारी शंकर वानखेडे (रा. गिराड जि. वाशिम) याच्याकडे असल्याचे समोर आले. त्याची कसून चौकशी केली असता ही रक्कम त्याने घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर घेतलेल्या रकमेतील अडीच लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद हिवसे यांच्या फिर्यादीवरून शंकर वानखेडे याच्याविरुद्ध १५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत.

Web Title: Crime against an employee of a finance company for embezzling Rs 15 lakh