बँकेची कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीस कंटेनरने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 18:02 IST2021-09-27T18:01:37+5:302021-09-27T18:02:45+5:30
रस्त्यात उभ्या ट्रकला ओव्हरटेक करताना झाला अपघात

बँकेची कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीस कंटेनरने चिरडले
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या पती-पत्नीला कंटेनरने जोराची धडक दिली. यात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. ही घटना कळमनुरी तालुक्यातील वरुड शिवारात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी असलेले प्रभाकर बावगे ( 55 वर्ष ) व पत्नी सुनीताबाई प्रभाकर बावगे हे दोघे दुचाकीने डोंगरकडा येथे आले होते. बँकेचे काम आटोपून परत गावाकडे निघाले. यावेळी वरूड शिवारात बंद पडलेल्या ट्रकला ओलांडून जात असताना एका भरधाव वेगातील कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती जमादार भगवान वडकिल्ले यांनी दिली आहे .घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले.