शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे देशाने जवान गमावला; गाडी खड्ड्यात आदळ्याने बंदुकीतून अचानक गोळी सुटून जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 14:25 IST

नांदेडला कामानिमित्त गाडीतून जात असताना झाली घटना.

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) :  येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाचा अपघातात छातीत गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. त्यांच्या फोर्सच्या डॉक्टरला आणण्यासाठी नांदेडला जात असताना खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्याने रायफलमधून अचानक गोळी झाडल्या गेली, ती थेट छातीत लागल्याने जवान पप्पाला भानूप्रसाद यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील  येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद ( वय 35 वर्षे ,रा. आंध्र प्रदेश ) हे कर्तव्यावर  होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते दलाच्या गाडीमध्ये हैदराबादवरून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी जात होते.

दरम्यान, हिंगोली ते नांदेड या रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. डोंगरकडापासून तीन किलोमीटरवर गाडी आली असता रस्त्यावरील एका खड्ड्यात गाडी आदळली. यावेळी जवान पप्पाला भानुप्रसाद यांच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली. ती थेट जवान छातीत घुसल्याने जवान पप्पाला गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

माहिती मिळताच ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड , पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. सशस्त्र सीमा बलाचे कमांडंट तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. नांदेड-हिंगोली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात घडला असून खड्ड्यांमुळे जवानाचा जीव गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीIndian Armyभारतीय जवानAccidentअपघात