हिंगोलीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:57 IST2019-01-25T17:56:40+5:302019-01-25T17:57:07+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे.

हिंगोलीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा
हिंगोली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठीहिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. परंतु अद्याप आरक्षण दिले नाही. धनगर समाजाला आरक्षण दिले नसल्यामुळे नगरसेविका लताबाई नाईक यांनी शुक्रवारी पदाचा राजीमाना दिला आहे. तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक यांनीही शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरूच राहिल असेही नाईक यांनी सांगितले.