धनगर आरक्षणासाठी नगरसेविकेचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:47 IST2019-01-25T23:47:31+5:302019-01-25T23:47:56+5:30

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोलीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे.

 Corporator resigns for Dhan Dhar reservation | धनगर आरक्षणासाठी नगरसेविकेचा राजीनामा

धनगर आरक्षणासाठी नगरसेविकेचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोलीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. परंतु अद्याप दिले नाही. त्यामुळे नाईक यांनी शुक्रवारी पदाचा राजीमाना दिला आहे. तर अशोक नाईक यांनीही शिवसेना शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरूच राहील. गावोगाव जाऊन यासाठी जागृती करू, असेही नाईक यांनी सांगितले.

Web Title:  Corporator resigns for Dhan Dhar reservation